महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बसप नेत्याच्या हत्येप्रकरणी भाजप महिला नेत्याला अटक

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हल्लेखोराला 10 लाख ऊपये दिल्याचा आरोप,  आतापर्यंत 15 संशयितांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नाई

Advertisement

तामिळनाडूमधील बसपचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग (52) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाजप महिला पदाधिकारी अंजलाई यांना अटक केली आहे. उत्तर चेन्नईच्या महिला मोर्चाच्या अधिकारी अंजलाई यांच्यावर आर्मस्ट्राँगच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या हल्लेखोराला 10 लाख ऊपये दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांना वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका गुन्हेगाराकडून मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने हल्लेखोरांना आश्र्रयही दिला होता. आर्मस्ट्राँग हत्येप्रकरणी अंजलाई यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

5 जुलै रोजी दुचाकीवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी चेन्नाईतील घराबाहेर आर्मस्ट्राँग यांची चाकू आणि तलवारीने हत्या केली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना अपोलो ऊग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येनंतर एका दिवसात 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर 18 जुलै रोजी पोलिसांनी सतीश, मलारकोडी आणि हरिहरन नावाच्या तिघांना ताब्यात घेतले. तर गेल्या रविवारी सकाळी तिऊवेंगडम येथे झालेल्या पोलीस चकमकीत या हत्येतील प्रमुख आरोपी मारला गेला होता.

तामिळनाडूतील बसप नेत्याच्या हत्येबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. हा खटला जलदगतीने चालवण्याची सूचनाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article