महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार

06:22 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य : स्वबळावर बहुमत मिळविण्यापासून रोखणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकताहे. परंतु सरकार स्थापन करण्यासाठी त्याला स्वबळावर बहुमत न मिळाल्यास त्याचे घटक पक्ष त्याला समर्थन करण्यास नकार देऊ शकतात. तसेच भाजपऐवजी विरोधी पक्षांच्या आघाडीला समर्थन देण्याची तयारी दाखवू शकतात असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ साहित्य समारंभात बोलताना म्हटले आहे.

भारत विविधतेने नटलेला देश आहे. याचमुळे इंडिया आघाडीसंबंधी राज्यांमध्ये 100 टक्के सहमती होणे शक्य नाही. मला अजूनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे वाटते. परंतु त्याचे संख्याबळ कमी करणे शक्य आहे. या दृष्टीनेच आम्हाला प्रयत्न करावे लागतील असे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.

इंडिया आघाडीत शक्य होईल तितक्या राज्यांमध्ये पुरेशी सहमती होईल अशी अपेक्षा आहे. या आघाडीत 28 विरोधी पक्ष सामील आहेत. एका राज्यात सर्व विरोधी पक्षांदरम्यान एकच उमेदवार उभा करण्यावर सहमती होऊ शकते, तर दुसऱ्या  राज्यात दोन किंवा तीन उमेदवार असू शकतात. अशा स्थितीत मतदाराला सर्वोत्तम प्रतिनिधी निवडावा लागणार असल्याचे थरूर यांनी इंडिया आघाडीसंबंधी बोलताना म्हटले आहे.

प्रत्येक राज्यात वेगळी स्थिती

काँग्रेस नेत्याने जागावाटपावरून केरळ आणि तामिळनाडू या दोन शेजारी राज्यांचे उदाहरण दिले आहे. केरळमध्ये  इंडिया आघाडीतील दोन प्रमुख स्पर्धक माकप आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर सहमती होऊ शकेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. परंतु शेजारच्या तामिळनाडूत भाकप, माकप, काँग्रेस आणि द्रमुक सर्व जण आघाडी करत असून तेथे यावर कुठलाच वाद नाही. यापूर्वी देखील या पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली असल्याचे थरूर म्हणाले.

सर्वोत्तम उमेदवाराला मत द्या

स्वत:च्या मतदारसंघातील सर्वात चांगल्या उमेदवाराला मत द्या असे देशाच्या लोकांना सांगण्याची गरज आहे. मोदी-मोदी हा नारा देणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की त्यांना केवळ वाराणसीचे लोकच मतदान करू शकतात. प्रत्येकाने स्वत:च्या मतदारसंघातील चांगला उमेदवार निवडावा. जर मोदींसाठी प्रतिनिधी निवडायचा असेल तर ही लोकांची पसंत असेल असे थरूर यांनी नमूद पेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article