लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा पार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत भाजपला 400 जागांच्या जागा मिळणारच असा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले असल्याने भाजप यावेळी लोकसभेच्या 400 जागा नक्कीच पार करेल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधीमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. "पंतप्रधान मोदींनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित केले असून एका दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. जनतेनेही त्यांना साथ दिली आहे आणि त्यामुळेच येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप 400 जागांचा टप्पा पार करेल. महाराष्ट्र राज्यातही 45 जागांचा टप्पा पार करण्यास कोणतीच अडचण असणार नाही.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या 50 वर्षांत ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गेल्या 10 वर्षांत घडल्या आहेत. आणि हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळेच घडले आहे."
पुढे राज्यातील सत्ताधारी 'महायुती' आघाडीच्या कारभाराचे कौतुक करताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने राज्यात आतापर्यंत सुमारे 24 हजार पोलिसांची भरती करण्याचा विक्रम केला असल्याची माहीती दिली. ते म्हणाले, "आमचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आम्ही पोलिस भरतीत विक्रम केला आहे. आतापर्यंत सुमारे 24 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे, आणि आता आम्ही आणखी 17 हजार पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात काढणार आहे" असेही ते म्हणाले