फोडाफोडीच्या राजकारणाचं पेटंट फक्त भाजपकडे ! सतेज पाटलांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटलांना प्रत्युत्तर
देश पातळीवर पक्ष फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे असून फोडाफोडीच्या राजकारणाची टिका ही भाजपलाच लागू होत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. तसेच विरोधकांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम असून त्यामुळेच ते माझ्या बाबतीत बोलत असतात. असंही त्यांनी उपहासात्मकरित्या म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षातील अकार्यक्षमता कोल्हापूरकरांनी पाहीली असून कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही व्हीजन विरूद्ध अकार्यक्षमता असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसापुर्वी संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर फोडाफोडीचं राजकारण करण्याचा आरोप केला होता.
पहा VIDEO >>> पक्ष फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे; सतेज पाटील यांची भाजपवर टिका
हेही वाचा >>> सतेज पाटील यांचं राजकारण फुटीच्या आधारावर ! मंत्री चंद्रकांत पाटलांची सतेज पाटलांवर जोरदार टिका
राज ठाकरे यांची भुमिका संभ्रम निर्माण करणारी....
पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपण भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला असल्याचं जाहीर केलं. यावर भाष्य करताना सतेज पाटील यांनी राज ठाकरेंचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे यांची 2019ची आणि आत्ताची भूमिका पाहता युतीमध्ये जाऊन ते 2- 4 जागा लढवतील असे वाटलं होतं. मात्र कोणतीच जागा लढवायची नाही हा निर्णय मनसेच्या कार्यकर्त्यांना न पटणारा आहे. भाजपकडून फोडाफोडीचा राजकारणाला राज ठाकरे यांनी विरोध केला होता पण आता अचानक यूटर्न घेतला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे...
चंद्राकांत पाटलांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, चंद्रकांत दादा जे काही बोलतात ते भाजपला लागू होत आहे. संपुर्ण देशभरात फोडाफोडीच्या राजकारणाचं पेटंट फक्त भाजपकडे आहे. दादांचा अभ्यास जास्त आहे पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये 'हू इस धंगेकर....' असे म्हटले होते आणि त्याचा परिणाम आपण पाहिला आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
खासदार बदला...परिस्थिती बदलेल
विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी अजिक्यतारावर केलेल्या टिकेला आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरच्या जनतेनं खासदार बदला...परिस्थिती बदलेल असं ठरवलं आहे. त्यामुळे खासदार बदलण्याचा हट्ट कोल्हापूरच्या जनतेचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजिंक्यतारा हा विरोधकांनी केलेला निवडणुकीचा मुद्दा आहे. त्यांनी चालवलेल्या अजेंड्याला आम्ही शह दिला आहे. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी ते आता बोलत असून 2019 च्या निवडणुकीमध्ये अजिंक्यताराचा रोल काय होता हे त्यांनी पाहीलं आहे.
सांगलीत काँग्रेसला योग्य तो सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगलीतील राजकिय परिस्थितीवर भाष्य केले. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगलीच्या जागेसंदर्भात खुलासा झाला असून सांगलीतील स्थानिक परिस्थिती नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हाताळत आहेत. त्याठिकाणी काँग्रेसला योग्य तो सन्मान मिळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदींची सभा आणि व्हिजन विरुद्ध कार्यक्षमता
कोल्हापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचं त्यांना विचारले असता त्यांनी प्रत्येक पक्षाचे ज्याचे त्याचे धोरण असतात. मात्र नरेंद्र मोदींच्या सभेचा कोल्हापूरमध्ये कोणताच परिणाम होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोल्हापूरकरांचा आता निर्णय झाला असून ही निवडणूक व्हिजन विरुद्ध कार्यक्षमता अशीच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.