कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara Municipal Council Election : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील यांचा शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

04:24 PM Nov 18, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                 भाजप विरोधात महाविकास आघाडीची संयुक्त रणनिती

Advertisement

सातारा - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्याना सातार नगरपरिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून सातारा नगरपालिकेत भाजपला पर्यायाने दोन्ही राज्याना आव्हान निर्माण केले आहे.

Advertisement

आज नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक होते परंतु काल रात्रीपासून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत डावपेच आखले

भाजपकडून उमेदवारी नाकारली गेलेल्या भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावर प्रदेशाध्यक्ष आ शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा चे उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील,काँग्रेसचे रणजीत देशमुख यांच्यासोबत विचार विनयमय करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने सुवर्णा नरेंद्र पाटील याना उमेदवारी देण्याचे ठरले..

यावेळी काँग्रेसचे बाबासाहेब कदम राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई,जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील,काँग्रेसचे सरचिटणीस एड दत्तात्रय धनवाडे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील उपस्थित होते या बैठकीत महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून सौ पाटील यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला..

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBJP Political SetbackMaha Vikas Aghadi StrategyMayor Candidate AnnouncementSatara Municipal Council ElectionSuvarna Patil Joins NCPSuvarnaPatil
Next Article