For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदीगढमध्ये भाजपने दाखविले सामर्थ्य

06:26 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चंदीगढमध्ये भाजपने दाखविले सामर्थ्य
Advertisement

आम आदमी पक्षाचा पराभव करत पटकाविले ज्येष्ठ उपमहापौरपद आणि उपमहापौरपद

Advertisement

वृत्तसंस्था / चंदीगढ

पंजाब आणि हरियाणाची राजधानी असणाऱ्या चंदीगढ शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला न्यायायलायच्या निर्णयामुळे फटका बसला असला, तरी ज्येष्ठ उपमहापौर आणि महापौर पदाची निवडणूक या पक्षाने जिंकली आहे. या पक्षाचे कुलजीतसिंग संधू हे ज्येष्ठ उपमहापौरपदी, तर राजिंदर शर्मा हे उपमहापौरपदी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना हरवून निवडून आले आहेत.

Advertisement

ज्येष्ठ उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत कुलजीतसिंग संधू यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा 19 विरुद्ध 16 अशा मतांनी पराभव केला. या निवडणुकीत एक मत अवैध ठरविण्यात आले होते. तसेच उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत राजिंदर शर्मा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 19 विरुद्ध 17 अशा मतांनी पराभव केला. या दोन्ही निवडणुका महापौर कुलदीप कुमार यांच्या देखरेखीत पार पडल्या.

महापौरपद गमावले

महापौर पदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाची सरशी झाली होती. तथापि, त्यावेळच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आठ मते अवैध ठरविली होती. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने सर्व मतपत्रिकांची तपासणी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर कठोर ताशेरे झाडले होते. न्यायालयाने आठ मते अवैध ठरविण्याचा निर्णय रद्द केला आणि ही सर्व मते वैध आहेत, असे समजून पुन्हा मतगणना करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाचा उमेदवार महापौर झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

आम आदमी पक्षात फूट

मधल्या काळात आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परिणामी, भारतीय जनता पक्षाचे बहुमत झाले होते. या बहुमताच्या भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे मिळविली आहेत. महापौरपद पुन्हा मिळविण्यासाठी मात्र या पक्षाला सहा महिने वाट पहावी लागणार आहे. कारण आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडण्याच्या आधीच महापौरपदाची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर सहा महिने नव्या महापौरांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षाला ज्येष्ठ उपमहापौरपद आणि महापौरपद या दोन पदांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र, या पक्षाचे बहुमत कायम राहिले, तर सहा महिन्यांच्या नंतर महापौरपदही हा पक्ष मिळविणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदही शक्य

कोणत्याही महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद सर्वात महतवाचे असते. चंदीगढ महानगरपालिकेत आता भारतीय जनता पक्षाचे बहुमत असल्याने हा पक्ष हे महत्वाचे पद मिळवू शकतो. या पदासाठी नंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपद वगळता इतर महत्वाची पदे या पक्षाला मिळू शकतात.

Advertisement
Tags :

.