उद्या भाजप ,शिवसेनेचे उमेदवार दाखल करणार अर्ज
सावंतवाडी नगरपालिका निवडणूक
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना व भाजप असे दोन्ही पक्ष सावंतवाडीत उद्या शनिवार 15 नोव्हेंबरला दुपारी बारानंतर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करणार आहेत. सावंतवाडीत उद्या पालकमंत्री नितेश राणे एका कार्यक्रमा निमित्ताने उपस्थित राहणार आहेत तसेच शिंदे शिवसेनेच्या वतीने आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब आधी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. पक्षाचे एबी फॉर्म उपलब्ध झाले आहेत. शिंदे शिवसनेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून ॲड. नीता सावंत- कविटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची शक्यता आहे . जिल्हाप्रमुख संजू परब हे खासकिलवाडा तर शहरप्रमुख बाबू कुडतरकर , माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो आपापल्या प्रभागातून आपला नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपचे शहर प्रमुख सुधीर आडीवरेकर ,आनंद नेवगी, दिपाली भालेकर,मोहिनी मडगावकर आधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.