For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप खासदार घोष, काँग्रेस नेत्या श्रीनेत अडचणीत

06:08 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप खासदार घोष  काँग्रेस नेत्या श्रीनेत अडचणीत
Advertisement

निवडणूक आयोगाने दिला इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत आता अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी महिलांच्या विरोधात अवमानास्पद टिप्पणीसाठी भाजप खासदार घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची निंदा केली आहे.

Advertisement

आयोगाने आचारसंहितेच्या उल्लंघानावर जारी करण्यात आलेल्या नोटीसवर उत्तर मिळाल्यावर स्वत:च्या आदेशात घोष आणि श्रीनेत यांनी वैयक्तिक स्तरावर शाब्दिक हल्ले केले आणि आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे.

विशेषर नजर ठेवणार

आता दोन्ही नेत्यांना आदर्श आचार संहितेच्या कालावधीदरम्यान सार्वजनिक वक्तव्यांमध्ये खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आहे. तसेच निवडणूक संबंधी त्यांच्या प्रचारावर आयोगाकडून विशेष आणि अतिरिक्त नजर ठेवली जाणार आहे. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा आचारसंहितेचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

श्रीनेत यांची वादग्रस्त पोस्ट

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी  हिमालचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप उमेदवार कंगना रनौत यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे मोठा वाद उभा ठाकला होता.  या वादामुळे श्रीनेत यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.  श्रीनेत यांच्यावर भाजपकडून याप्रकरणी जोरदार टीका करण्यात आली होती.

दिलीप घोषांकडून टिप्पणी

तर भाजप नेते दिलीप घोष यांनी प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी भाजप आणि निवडणूक आयोगाने घोष यांना नोटीस बजावली होती. यानंतर घोष यांनी स्पष्टीकरण देत ममता बॅनर्जी यांची माफी मागितली होती.

पक्षप्रमुखांना नोटीसची प्रत

इशारा नोटीसची एक प्रत पक्षप्रमुखांनाही पाठविण्यात आली आहे. जेणेकरून हे पक्षप्रमुख स्वत:च्या नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रचार करताना खबरदारी बाळगण्याचा आणि अशाप्रकारच्या अपमानास्पद टिप्पणी आणि आचारसंहितेच्या उल्लंघन टाळण्यासाठी जागरु करू शकतील असे आयोगाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.