महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे मंत्री सुरेंद्र पाल राजस्थानमध्ये पराभूत; विधानसभेच्या जागेवर काँग्रेस उमेदवार 11 हजार मतांनी विजयी

06:24 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थानमध्ये आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी मंत्रीपद देण्यात आलेले सुरेंद्र पाल सिंह हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सुरेंद्र पाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या ऊपिंदर सिंह कुन्नर यांनी 11 हजार 261 मतांनी पराभव केला. या पराभवामुळे सुरेंद्र पाल सिंह यांनी रात्री उशिराने मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Advertisement

राजस्थान विधानसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार होण्यापूर्वीच सरकारमध्ये मंत्री झालेले सुरेंद्र पाल सिंह यांना विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा एकूण 200 पैकी फक्त 199 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या. श्रीगंगानगरमधील करणपूर या जागेवर काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे येथील निवडणूक लांबणीवर पडली होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीची नवीन तारीख निश्चित केल्यानंतर 5 जानेवारी रोजी काँग्रेसचे दिवंगत आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांचा मुलगा ऊपिंदर सिंह यांना या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बनवण्यात आले होते.

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 199 जागांपैकी भाजपने 115 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला केवळ 69 जागा मिळाल्या. या बंपर विजयानंतर 15 डिसेंबरला भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. भजनलाल शर्मा यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सुरेंद्र पाल सिंह यांना स्थान दिले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article