For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 सप्टेंबरपासून भाजप सदस्यत्व अभियान

06:44 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
2 सप्टेंबरपासून भाजप सदस्यत्व अभियान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजप पुन्हा स्वत:च्या सर्व सदस्यांना नव्या स्वरुपात जोडण्याची तयारी करत आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी 2 सप्टेंबरपासून पक्षाची सदस्यत्व मोहीम सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. 2 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सदस्य करत या अभियानाची सुरवात करणार आहेत.

पक्षानुसार ही प्रक्रिया दर 5-6 वर्षांमध्ये होत असते. 2 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सदस्यत्व अभियानात वर्तमान सदस्यांना देखील पुन्हा सदस्यत्व घ्यावे लागते. पूर्वी चीनचा कम्युनिस्ट पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष होता, परंतु 2014 मध्ये भाजपचे 11 कोटी सदस्य झाल्यावर आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हे सदस्यत्व अभियान केवळ संभाषणाचे माध्यम नसून भाजपचे विचार आणि करण्यात आलेल्या कार्यांचा प्रचार करण्याचे देखील एक माध्यम असल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिस्ड कॉलद्वारे पुन्हा भाजपचे सदस्य होतील अणि हा कार्यक्रम 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या केंद्रीय कार्यालय विस्तारमध्ये आयोजित होणार आहे. देशाचा कुठलाही नागरिक संबंधित क्रमांकावर  मिस्ड कॉल देत किंवा नमो अॅपच्या माध्यमातून भाजपचे सदस्यत्व मिळवू शकतो.

या सदस्यत्व अभियानाचा पहिला टप्पा 25 सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सदस्यत्वाचे विश्लेषण केल्यावर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्व अभियानाचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. यानंतर 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत सक्रीय सदस्यत्व अभियान चालविण्यात येणार आहे. सदस्यत्व अभियानाशी अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसमवेत पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही यात सामील केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.