शौमिका महाडिकांसाठी आदेश आल्यास हातकणंगले लढण्यास महाडिक परिवार तयार- खासदार महाडिक
सध्या देशात भाजपचा बोलबाला असून कोल्हापूरातील एक जागा भाजपला मिळाव्यात याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्या आहेत. कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे असल्या तरी वरिष्ठांनी शौमिका महाडिकांना तसा आदेश दिल्यास एक जागा लढवण्यास महाडिक परिवार तयार असल्याचं स्पष्टीकरण भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय मंडलिक यांनी म्हटले आहे.
पहा VIDEO >>> शौमिका महाडिकांसाठी आदेश आल्यास हातकणंगले लढण्यास महाडिक परिवार तयार- खासदार महाडिक
आज कोल्हापूरात भाजप कार्यालयामध्ये खासदार धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज भाजपचे खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे. कोल्हापूरातील एक जागा भाजपाला मिळावी यावर चर्चाही झाली होती. सध्या कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जेव्हा कोल्हापूरात आले होते तेंव्हा भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील एक लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती केली होती." असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, "सोलापूरमध्ये 2 वेळा भाजचे खासदार निवडून आले होते. सातारामध्ये उदयनराजे निवडून आले. सांगलीत संजयकाका दोन वेळा निवडून आले. त्यामुळे कोल्हापूरातही त्या पद्धतीचं वारं असून शौमिका महाडिक यांना जर केंद्रीय नेर्तृत्वाकडून आदेश आला तर हातकणंगलेमधून लढण्याची महाडिक परिवाराची तयारी आहे." असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी महायुतीलाही पाठींबा द्यावा...
पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांच्या 'एकला चलो रे' च्या भुमिकेवर बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीची ताकद आहे हे नकरता येणार नाही. मात्र MVA ने त्यांना जो फॉर्मुला दिला तो त्यांना मान्य आहे असं वाटतं नाही. प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलो चा नारा दिला आहे तर काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. महायुतीला सुद्धा त्यांनी पाठिंबा द्यावा असे प्रयत्न करायला काही हरकत नाही. असं खासदार महाडिकांनी म्हटलं आहे.