भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर! पंतप्रधान मोदींची घोषणा
1990 च्या दशकामध्ये अयोध्येमधील राम मंदिरासाठी आपल्या रथयात्रेद्वारे भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख देणारे भाजप जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X या सोशल मिडीया अकाउंटवरून ही माहिती दिली.
या वेळी माहीती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "श्री लालकृष्ण अडवाणी जी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले," असे त्यांनी X वर लिहिले आहे.
पंतप्रधान मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार जाहीर करताना भारताच्या विकासात लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ते भारतातील दृष्ट्या राजकारण्यांपैकी एक असल्याचं म्हटले आहे.
ते म्हणाले, “आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेल्या अडवाणीजींचे भारताच्या विकासात अतुलनीय योगदान आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचा जीवनप्रवास आहे. त्यांनी देशासाठी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम केले. त्यांनी केलेला संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेला आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शेवटी लिहीताना त्यांनी "अडवाणीजी यांनी सार्वजनिक जीवनात अनेक दशके सेवा केली आहे. त्यामधील पारदर्शकते मुळे आणि सचोटीच्या वचनबद्धतेने विषेश गौरवली गेली आहे. त्यांच्या या राजकीय नैतिकतेमध्ये भारतीय राजकारणात अनुकरण निर्माण केले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा विशेषाधिकार मानेन,” असेही ते म्हणाले.