महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंदोरमध्ये भाजप नेत्याची हत्या

06:23 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयावर गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisement

भाजपचे दिग्गज नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मोनू कल्याणे यांची शनिवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली आहे. भाजपच्या बाइक रॅलीसाठी होर्डिंग लावले जात असताना मोनू यांची हत्या करण्यात आली आहे. मोनू यांची हत्या त्यांच्या घरानजीक राहणाऱ्या गुंडांनीच केली आहे. हत्येनंतर मोनू यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोनू हे भाजप युवा मोर्चाचे नगर उपाध्यक्ष होते.

रविवारी सकाळी बाइक रॅली असल्याने मोनू हे शनिवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात बॅनर आणि पोस्टर लावत होते. त्याचदरम्यान बाइकवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांनी मोनू यांच्या सहकाऱ्यांवरही गोळ्या झाडलया होत्या. अर्जुन पथरोड आणि पियूष पथरोड यांनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुन आणि मोनू यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

मोनू हे भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय आणि आकाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. मोनू यांच्या हत्येची माहिती कळताच आकाश विजयवर्गीय आणि अन्य नेत्यांनी त्वरित त्याच्या घरी धाव घेतली. आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांना अटक करण्यासाठी पथकांना रवाना करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक राम स्नेही मिश्रा यांनी दिली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article