महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदू धर्माला भाजपकडूनच धोका

10:06 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप

Advertisement

कारवार : भाजपने राजकारणासाठी कोणत्याही देवाला सोडले नाही. कोणत्या संतालाही सोडले नाही. हिंदू धर्माला अन्य कोणापासून नव्हे तर भाजपवाल्यांकडूनच धोका आहे, असा आरोप कारवार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला. त्या हल्याळ तालुक्यातील तेरगाव व्याप्तीतील काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलत होत्या. त्या पुढे म्हणल्या, भाजपचे कार्यकर्ते आपण हिंदुत्वाचे रक्षणकर्ते असा दावा करीत आहेत. मोघल, ब्रिटिश राजवटीवेळीही हिंदू धर्माला धोका देण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. तथापि, आता हिंदू धर्माला धोका देण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांकडून होत आहे. शिवाजी महाराज, श्रीरामाचा अपमान केला जात आहे. श्रीराम नेहमीच सीता, लक्ष्मण आणि हनुमानांसोबत दिसले पाहिजेत. सर्व मंत्रामध्ये सीता आणि श्रीरामांचा समावेश असतो. तथापि भाजपवाल्यांनी प्रभू रामचंद्रांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

हिंदू धर्मात जन्मल्याचा अभिमान

आपला जन्म हिंदू धर्मात झाल्याचा अभिमान आहे, असे स्पष्ट करून निंबाळकर पुढे म्हणाल्या, भाजपवाल्यांकडून आपणाला हिंदू धर्माबद्दल शिकायची काही एक गरज नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात अनेक जात बांधवांचा समावेश होतो असे म्हटले होते. हिंदू धर्म कोणत्याही एका जातीला सिमित नाही. हिंदू धर्माची संकल्पनाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. काँग्रेसने 60 वर्षात काय केले? असा प्रश्न भाजपकडून केला जातो. त्या पुण्यात्म्यांना गुजरातला पाणीपुरवठा करणाऱ्या डॅमची निर्मिती काँग्रेसने केली हे कोण सांगणार. काँग्रेसच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपला खेडेगावात गटारीची निर्मिती करणे शक्य झाले नाही. खोटी आश्वासने देऊन जात, धर्माच्या आधारावर मते मागण्यासाठी येथे आलो नाही तर त्याऐवजी विकासाच्या मुद्यावर मते मागायला तुमच्याकडे आलो आहे.

हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे याप्रसंगी म्हणाले, राष्ट्र, राज्य आणि तालुक्यांचा विकास घडवून आणण्यात महिलांनी फार मोठी भूमिका बजावलेली आहे. तरीसुद्धा महिलांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळणे फार कठीण असते. कारवार लोकसभा मतदारसंघातून आजअखेर भाजपकडून एकदाही उमेदवारी आलेली नाही. तथापि काँग्रेसने मात्र भाजपला जे जमले नाही ते करून दाखविले आहे. गॅरंटी योजनांसह काँग्रेसने महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. निंबाळकर यांना मतदान करून पुन्हा एकदा महिला खासदार लोकसभेवर पाठविण्याचा चंग बांधा, असे आवाहन देशपांडे यांनी केले. यावेळी कारवार जि. पं. चे माजी सदस्य कैतान बारबोझा, जि. पं. चे माजी उपाध्यक्ष संतोष रेणके, पूरसभेचे माजी अध्यक्ष अजर बसरीकट्टी, डी. वाय. डांगे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article