महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात पाचव्यांदा भाजप सरकार येणार

06:55 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवराज सिंह चौहानांचा दावा

Advertisement

मध्यप्रदेशात भाजप पाचव्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. लाडली बहना योजनेच्या लाभार्थींनी पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व अडथळे ओलांडले आहेत असे चौहान यांनी बुधनी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.

Advertisement

राज्यात सरकार स्थापन करण्यावरून कुठलाच संशय नाही. चुरशीची लढत होईल असे बोलले जात आहे, परंतु प्रत्यक्षात अशी स्थिती नाही. कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत केली असून लाडली बहनांनी सर्व अडथळे दूर केले आहेत. राज्यात भाजपकडून करण्यात आलेल्या कार्यांसाठी लोक आम्हाला आशीर्वाद देतील असे चौहान यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article