महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजप ईडी चालवत नाही ; ईडी ही स्वायत्त संस्था

04:17 PM Dec 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ; जे दोषी आहेत त्यांना आम्ही भाजपमध्ये कधी घेतलं नाही, घेणारही नाही

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

ज्यांच्यावर आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांना शिक्षा झाली आहे अशा कुठल्याही व्यक्तींना आम्ही भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही आणि देणारही नाही. खासदार राहुल गांधी आणि नेते लालूप्रसाद यादव यांना शिक्षा झाली आहे. त्यांना आम्ही कुठे भाजपमध्ये घेतले.त्यामुळे अशा शिक्षा झालेल्यांना भाजपमध्ये आम्ही घेणार नाही. भाजपच्या एकही आमदार खासदारांवर दोषारोप नाहीत. असे अजय कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. आणि भाजप ईडी चालवत नाही. फक्त खोटा प्रचार विरोधक करत आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. साडेनऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात विकासात्मक कामे केली आहेत. आणि या देशातील जनतेला स्वास्थता लाभावी यासाठी विकास संकल्प यात्रा आम्ही गावागावात पोहोचवणार आहोत. या माध्यमातून सर्व जनतेला शासनाच्या विविध योजना पोहोचत आहेत की नाहीत याबाबतची आम्ही खात्री करून घेत आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार ,बाळू देसाई ,मनोज नाईक, श्वेता कोरगावकर ,आनंद नेवगी ,अजय गोंदावळे ,दिलीप भालेकर, सचिन साठेलकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर ,प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# ajay kumar mishra # sawantwadi # tarun bharat news# sindhudurg# Union Minister of State for Home Affairs
Next Article