For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहार निवडणूकीच्या विजयानंतर कुडाळात भाजपचा जल्लोष

04:26 PM Nov 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
बिहार निवडणूकीच्या विजयानंतर कुडाळात भाजपचा जल्लोष
Advertisement

कुडाळ -

Advertisement

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळवित ऐतिहासिक विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथील भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष करीत आनंद व्यक्त केला फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली.या विधानसभा निवडणुकीत एनडीए व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. एनडीएमध्ये भाजप, जनता दल युनायटेड , लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) यांचा समावेश होता,तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल , काँग्रेस, विकसनशील इंसान पार्टी तसेच सीपीआय, सीपीएम आणि सीपीआय (एम-एल) असे तीन डावे पक्ष होते. अटीतटीच्या या निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवून विजयी मुसंडी मारली.या विजयानंतर कुडाळ शहरातील भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी आज येथील भाजप कार्यालयासमोर फटाके वाजवून विजयी घोषणाबाजी केली आणि परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, सौ. संध्या तेरसे, रुपेश पावसकर, महिला आघाडी सरचिटणीस अदिती सावंत, युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष तन्मय वालावलकर, कुडाळ शहराध्यक्ष सुनील बांदेकर, विशाखा कुलकर्णी, माजी नगरसेवक सचिन काळप, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, नारायण शृंगारे, योगेश राऊळ, दिगंबर गोवरकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.