महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

06:32 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक जागा मित्रपक्ष निजदला देण्याचा निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी 3 जून रोजी मतदान होणार असून शुक्रवारी अधिसूचना जारी झाली आहे. पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने वरिष्ठांकडे संभाव्य उमेदवारांची यादी पाठवून दिली होती. या यादीला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. भाजपने विधानपरिषदेच्या पाच तर निजदने एक जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी भाजपकडून पाचही उमेदवार जाहीर केले आहेत.

ईशान्य पदवीधर मतदारसंघातून माजी सदस्य अमरनाथ पाटील, नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघातून शिमोग्यातील वैद्य डॉ. धनंजय सर्जी, बेंगळूर पदवीधर मतदारसंघातून ए. देवेगौडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आग्नेय शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य वाय. ए. नारायणस्वामी, दक्षिण शिक्षक मतदारसंघातून ई. सी. निंगराजू यांना तिकीट देण्यात आले आहे. एक जागा मित्रपत्र निजदला सोडून देण्यात आली आहे. नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघातून निजदकडून उमेदवार जाहीर केला जाणार आहे. निजद नेते व विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य एस. एल. भोजेगौडा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय समजते.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या तीन आणि पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागांसाठी 3 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी 16 मे शेवटचा दिवस आहे. 17 मे रोजी अर्ज छाननी होईल. माघार घेण्यासाठी 20 मे अंतिम मुदत आहे. 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषद सदस्य असणारे आयनूर मंजुनाथ आणि मरितिब्बेगौडा यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसाठी तसेच डॉ. चंद्रशेखर पाटील, ए. देवेगौडा, डॉ. वाय. ए. नारायणस्वामी, एस. एल. भोजेगौडा यांचा कार्यकाळ 21 जून रोजी संपणार असल्याने चार जागांसाठी अशा एकूण सहा जागंसाठी मागील आठवड्यात निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article