For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी 29 उमेदवारांची भाजपकडून घोषणा

06:14 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आणखी 29 उमेदवारांची भाजपकडून घोषणा
Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी यादी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 29 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 आणि तिसऱ्या टप्प्यातील 19 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. जम्मूतील वादानंतर 26 ऑगस्ट रोजी पक्षाने 5 तासांत 3 याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 44 नावे होती, विरोध झाल्यावर सर्व नावे मागे घेण्यात आली. नंतर 15 नावे आणि नंतर एक नाव जाहीर केले. त्यानंतर काही नाराजांचे शंकानिरसन केल्यानंतर मंगळवारी नव्याने 29 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Advertisement

26 ऑगस्ट रोजी जम्मूतील पक्ष कार्यकर्त्यांनी पहिल्या यादीला विरोध केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी 44 नावांची पहिली यादी थांबवली. मंगळवारी जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत पक्षाने यापूर्वीच्या 28 नावांची पुनरावृत्ती केली आहे. केवळ श्रीमाता वैष्णोदेवी मतदारसंघातून पक्षाने रोहित दुबे यांचे नाव बदलून बलदेव राज शर्मा यांना तिकीट दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यात मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Tags :

.