For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्जेकोट येथील भाजप व मनसे कार्यकर्ते ठाकरे सेनेत

04:45 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सर्जेकोट येथील भाजप व मनसे कार्यकर्ते ठाकरे सेनेत
Advertisement

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश ; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसेच्याकार्यकर्त्यांनी भाजपला व मनसेला सोडचिठ्ठी देवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते सर्जेकोट गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले राणे स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. राणे हे घराणेशाही करत असून सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे येऊ देत नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले पर्ससीननेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीविरोधात सुरु असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढयात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छीमारांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईसाठी स्वतः समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजाने देखील आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे. याउलट विरोधी उमेदवाराच्या पक्षातील लोकांचेच पर्ससीन आणि एलईडी ट्रॉलर्स आहेत. त्यामुळे अनधिकृत मासेमारी राजरोसपणे केली जाते त्याला आळा घालण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार येणे गरजेचे आहे असे त्यांनी संगितले. आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत सर्जेकोट गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे. यावेळी दर्शन सावजी,तुषार परब , अक्षय पाटील,कौस्तुभ खडपकर,तुषार केळुसकर, अर्जुन आरोलकर, विशाल निकम ,गोविंद मेथर,राजू देऊलकर,रुपेश केळुसकर,वैभव केळुसकर ,रमेश केळुसकर,संजय मालंडकर,निलेश परब,निलेश गिरकर,विवेक गिरकर,अक्षय खडपकर,पांडुरंग करवडकर,सुदेश जामसंडेकर ,देविदास परब,विनायक परब,पप्पू कुर्ले,रामकृष्ण मालंडकर, किशोर जामसंडेकर ,महाबळेश्वर परब,प्रकाश करवडकर, वैभव करवडकर,जनार्दन आजगावकर,मिलिंद तेली,ऋषभ आजगावकर या भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर,निखिल नेमळेकर,संदीप शेलटकर ग्रामपंचायत सदस्य भारती आडकर,संजना शेलटकर,स्नेहा शेलटकर,मनस्वी आरोलकर,रेंवडी सरपंच अमोल वस्त,विनोद सांडव, केशव सावजी, रघुनंदन खडपकर, हर्षद कुर्ले, महादेव कुर्ले,शैलेंद्र सावजी,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :

.