बिर्ला रिअल इस्टेटमधील प्रकल्पा भरघोस प्रतिसाद
06:27 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नोएडा :
Advertisement
आदित्य बिर्ला रिअल इस्टेट यांच्या प्रकल्पातील घरांना चोविस तासात दमदार प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. 24 तासात 1800 कोटींची घरे विक्री झाल्याचे सांगितले जाते. बिर्ला इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडची सहकारी असणाऱ्या आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडच्या गुरुग्राम येथील बिर्ला प्रवाह या प्रिमीयम रहिवासी प्रकल्पात 1800 कोटी रुपयांच्या फ्लॅटस्ची विक्री 24 तासात विक्रमी वेळेत झाली आहे. सदरचा प्रकल्प सेक्टर 71 मध्ये 5.075 एकर क्षेत्रफळात बांधण्यात आलेला असून त्यात 492 फ्लॅटस्ची रचना करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातला 70 टक्के भाग हिरवाईसह राखण्यात आला आहे. अनेकविध आधुनिक सुविधांची भर या प्रकल्पात घालण्यात आलेली आहे.
Advertisement
Advertisement