अनेक प्रकारचा आवाज काढू शकणार पक्षी
लाल रंगाचे असतात पंख
कार्डिनल्स केवळ सुंदर लाल पक्षी नसून ते अनेक संस्कृती आणि परिस्थितिक प्रणालींमध्ये एक विशेष स्थान बाळगतात. कार्डिनल्स स्वत:च्या आकर्षक लाल पंखांसाठी ओळखले जातात. नर कार्डिनल्स अत्यंत उग्र क्षेत्रीय असतात, जे स्वत:च्या जागेच्या रक्षणासाठी लढाईत सामील होता. हा पक्षी जीवनभर एकाच सहकाऱ्यासोबत राहत असतो.
आकारात छोटा असलेला कार्डिनल्स पक्षी स्वत:च्या आकर्षक लाल पंखांसाठी ओळखले जातात. हा पक्षी अनेक प्रकारचे आवाज काढू शकतो. कार्डिनल्सचे पंख वर्षात झडून जातात आणि उन्हाळ्याच्या अखेरीस त्यांच्या पंखात नवी पिसे उगवत असतात. त्यांची चोच अत्यंत मजबूत असते तर नजर अत्यंत तीक्ष्ण असते, ज्यामुळे ती छोटी शिकार आणि भोजनाचा शोध घेत असतात.
कार्डिनल्स एका जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवत असतो. परंतु दोघांदरम्यान एक फरकही असतो. चमकणारा लाल रंग हा कार्डिनल्सच्या नरांचे वैशिष्ट्या असतो. तर मादी पक्षीचा रंग काहीचा वेगळा असतो. अनेक प्रकारचे आवाज काढत असल्याने कार्डिनल्सला गीत गाणारा पक्षी असेही म्हटले जाते.
कार्डिनल्स पहाटेपासूनच मधूर आवाज काढ असतात. अनेक प्रकारे ते स्वत:च्या सहकाऱ्यांना बोलावत असतात. तसेच आवाजाचा वापर ते संचारासाठी करतात, ज्यात इशाऱ्यापासून मिलनासाठीचा संकेत देखील सामील असतो. कार्डिनल्सना स्वत:च्या भागाशी अत्यंत आपुलकी असते. हा पक्षी तीव्र थंडीही सहन करू शकतो. कार्डिनल्स अत्यंत आक्रमक पक्षी असतो, नर तर स्वत:च्या प्रतिबिंबावर हल्ला करण्यासाठी ओळखला जातो. स्वत:च्या भागाच्या रक्षणासाठी हा पक्षी कुणालाही भिडण्यासाठी ओळखला जातो.
कार्डिनल्सच्या आहारात बीज, किडे आणि फळांचा समावेश असतो. हा पक्षी स्वत:च्या मजबूत चोचीद्वारे बीज बाहेर काढण्यास तरबेज असतो. हा पक्षी कपाच्या आकाराचे घरटे तयार करत असतो. यात मादी पक्ष्याची भूमिका अधिक असते, तर नर घरट्यासाठी सामग्री आणून देत असतो. या पक्ष्याला सनबाथ अत्यंत पसत असतो.