पूर्ण चेहऱ्यावर सुया टोचून घेत उपचार
येथे होतोय अनोखा उपचार
अॅक्यूपंक्चर हजारो वर्षांपासून जगभरात केले जात आहे, परंतु मार्केटमध्ये स्पर्धा असल्याने अनेकदा याचे चिकित्सक स्वत:चे पुढील तंत्रज्ञान विकसित करतात. जपानच्या टोकियोमध्ये शिराकावा अॅक्यूपंक्चर क्लिनिक असेच एक उदाहरण आहे.
येथे स्नायूदुखी आणि बॅड लक तसेच वाईट आत्म्याच्या तावडीतून सोडविण्याच्या नावाखाली चेहऱ्यासह शरीराच्या विविध हिस्स्यांमध्ये अनेक सुया रुतवल्या जातात. कथितपणे क्लिनिकवर सेशनसाठी 2 लाख येनहून अधिक शुल्क आकारले होते. जपानी सेलिब्रिटी आणि अॅथलिटांदरम्यान हे क्लिनिक अत्यंत लोकप्रिय आहे.
वाईट आत्म्यांपासून मुक्तीचा दावा
मागील महिन्यात जपानी अभिनेता मसाताका कुबोटाने शिराकावा क्लिनिकमये जपानी अॅक्यूपंक्चर करवत स्वत:ची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. यात सुयांनी त्याचा चेहरा आणि छातीचा बहुतांश हिस्सा झाकला गेला होता. छायाचित्रांना इन्स्टाग्रामद्वारे सेंसिटिव्ह कंटेंट म्हणून मार्क करण्यात आले होते. परंतु अभिनेत्याने या अनुभवाला मन प्रसन्न करविणारे ठरविले आहे. हे तंत्रज्ञान वेदनेसोबत वाईट आत्म्यांपासून मुक्ती मिळवून देत असल्याचा दावा केला जातो.
सेलिब्रिटी घेत आहेत ट्रिटमेंट
कुबोटाची पोस्ट व्हायरल झाली आहे. परंतु शिराकावायच अॅक्यूपंक्चर तंत्रज्ञानाला रुट अॅक्यूपंचर म्हणून ओळखले जाते, त्याविषयी पोस्ट करणारा तो पहिलाच सेलिब्रिटी नव्हता. एक महिन्यापूर्वी जपानी टेबलटेनिसपटू ऐ फुकुहाराने देखील स्वत:चा अनुभव शेअर करत आपण चेहऱ्याची छायाचित्रे पेस्ट करू इच्छित नाही कारण मी कुणाला घाबरू इच्छित नसल्याचे म्हटले होते. शिराकावाच्या काही अन्य प्रसिद्ध वापरकर्त्यांमध्ये अभिनेत्री ममी कुमागाई, गायिका हिरोमी गो आणि जिमनॅन्सट रयूसी निशिओका सामील आहे.
उपचारावेळी रडतात लोक
बहुतांश लोक जे हा उपचार करवून घेतात, ते रडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. हे आत्म्याच्या शुद्धीचे प्रकटीकरण आहे. हे त्यांना डिटॉक्स करणारे अश्रू असतात असा दावा क्लिनिकचे संस्थापक युसाकु शिराकावा यांनी केला आहे. शिराकावाचे अॅक्यूपंक्चर तंत्रज्ञान जुन्या वेदना आणि स्नायू जखडणे यासारख्या शारीरिक आजारांपासून दिलासा देण्यास मदत करते, परंतु अध्यात्मिक मुद्द्यांना देखील संबोधित करते, रुग्णांना उत्तम निर्णय घेण्यास मदत करते, त्यांचे नशीब सुधारते आणि आत्मा शुद्ध करत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
जपानमध्ये 500 रुट अॅक्यूपंक्चर डॉक्टर
शिराकावा अॅक्यूपंक्चर तंत्रज्ञानाचा अवलंब वेदनादायी असू शकतो. या प्रक्रियेत तीव्र धातूच्या सुयांचा वापर केला जात असल्याने वेदना तर होणारच. परंतु शिराकावा सध्या या अॅक्यूपंक्चर तंत्रज्ञानाचे सर्वात प्रसिद्ध चिकित्सक आहेत. परंतु निश्चितपणे ते एकमात्र नाहीत. जपानमध्ये सुमारे 500 रुट अॅक्यूपंक्चर डॉक्टर आहेत.