Solapur News : सोलापूरच्या विमानसेवेला पक्ष्यांचा अडथळा!
सोलापूर विमानतळाजवळील पक्षी धोक्यामुळे विमानसेवेवर सावट
सोलापूर : येबील होटगी रोडवरील विमानतळावरुन सोलापूर ते मुंबई, बेंगलोर, गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र सोलापूर विमानतळ परिसरात असलेल्या पक्षांच्या अस्तित्यामुळे सोलापूरची विमानसेवा घिरट्या वाढत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील मांस दुकानावर प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर विमानतळ परिसरातीत दहा मांस विक्री करणाऱ्या दुकानांची नोंदणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या दुकानांची दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्यात येत आहे. दुकानाच्या पसिरात कुठेही उघड्यावर गांस पडणार नाही, त्यामुळे पत्नी किंवा मटकी कुत्रे यांची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
सोलापूर विमानतळाच्या लगतच असलेली अतिक्रमण काढण्यात येत आहे याशिवाय या ठिकाणी असलेल्या मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचारी यांच्या संख्येतही वाढ करण्यात जाली आहे. विमानतळ पसिरात विमानसेवेसाठी आवश्यक असलेली सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळाच्या परिसरात वठा सीसी कॅमेरे बसविण्यात आले असून अजून १५ सीसी कैमेरे बसवून विमानतळाची सुरक्षा विमानसेवेच्या दृष्टीन अधिक बळकट करण्यात येत आहे.
सोलापुरातील आयटी पार्कच्या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य शासनाक पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्य उच्चाधिकारी समितीकडून पासाठी लवकरच मंजूरी मिळेल. एनटीपीशी कंपनीकडून आयट पार्कसाठी स्वस्त दरात बीज उपलब होण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यात्तयात बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे.
होटगी येथील नियोजीत जयट पार्कसाठी वीज, रस्ते, पाणी आदी सुविधांचाल नियोजन आखण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या सुमारे ४५ कोटी रुपयांपेक्ष अधिकची रक्कम कोणत्याही भूसंपादनासाठी लागणार नाही. आयटी पार्कमुळे कोणत्याही विमानसेवेता अडथळा येणार नाही. तरोच एनटीपीसी किया साखर कारखान्यांव्य प्रदूषणाचाठी परिणाम आयटी पार्क होणा नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.