कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग १० महिन्यांपर्यंत उडणार पक्षी

07:00 AM Mar 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झाडावर देखील बसत नाही

Advertisement

सलग 10 महिन्यांपर्यंत उडत राहणाऱ्या पक्ष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हा पक्षी सलग 10 महिन्यांपर्यंत उडत राहतो आणि यादरम्यान आकाशातच अन्न शोधतो आणि झोपही पूर्ण करतो. हा पक्षी झाडावर देखील बसत नाही. हा पक्षी आकाशातच खातो आणि आकाशातच झोपतो आणि सलग 10 महिन्यांपर्यंत उडू शकतो. या रहस्यमय पक्ष्याचे नाव कॉमन स्विफ्ट आहे. संशोधनातून हा पक्षी सलग 10 महिन्यांपर्यंत आकाशात भरारी घेऊ शकतो असे समोर आले आहे. हा पक्षी सर्वसाधारणपणे युरोपमध्ये आढळून येतो. हा पक्षी  बऱ्याचअंशी फिंकसारखा दिसतो. हा पक्षी स्वत:च्या वेगासोबत उडण्याच्या क्षमतेसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Advertisement

अत्यंत अधिक उंचीवर पोहोचल्यावर हा पक्षी तेथून हळूहळू खाली येताना सौम्य डुलकी घेत असतो. याचबरोबर वेगाने उडणारा हा पक्ष आकाशात उडणारे किटक पकडतो आणि खातो. हा पक्षी उडताना स्वत:च्या जोडीदाराला आकर्षित करत असतो. हा पक्षी सलग 10 महिन्यांपर्यंत उडू शकत असला तरीही खराब हवामानात कधीकधी या पक्ष्याला जमिनीवर यावे लागते. कॉमन स्विफ्टचा आकार टॉरपीडो मिसाइलसारखा असतो. तसेच याचे पंख टोकदार अन् लांब असतात. शतकांपासून पक्षीप्रेमी या पक्ष्याच्या उड्डाण कौशल्याने मोहित होत राहिले आहेत. दीर्घ प्रवासामुळे या पक्ष्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील नोंद आहे. हा पक्षी जेव्हा एखाद्या झाडाच्या फांदीवर किंवा जमिनीवर उतरतो, तेव्हा तो एक ते दोन तासांसाठी राहतो. यानंतर त्याचे उड्डाण पुन्हा सुरू होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article