बिंदू पणिक्करची कन्या करणार पदार्पण
06:31 AM Dec 16, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
कल्याणी पणिक्कर ही दिग्दर्शक जोशी यांच्या ‘रामबाण’ चित्रपटात सुपरस्टार मोहनलाल यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी पदार्पणात मिळाल्याने मी अत्यंत उत्सुक आहे. माझ्यासाठी ही अत्यंत मोठी संधी असून तिला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कल्याणीने म्हटले आहे. ‘रामबाण’ हा चित्रपट पितामुलीच्या नात्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन जोशी करणार आहेत. त्यांनी 82 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून यातील अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्यांनी प्रेम नजीर, ममुटी, जयन, मोहनलाल, सुरेशी गोपी आणि दिलीप यासारख्या दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. पणिक्कर आणि साईकुमार हे चित्रपटसृष्टीत सक्रीय असून दोघांनाही उत्तम अभिनयासाठी ओळखले जाते. दोघांनी 2007 मध्ये विवाह केला होता.
Advertisement
200 चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री बिंदू पणिक्कर यांची मुलगी कल्याणी देखील स्वत:च्या आईप्रमाणेच अभिनयाची कारकीर्द सुरू करणार आहे. कल्याणीला मल्याळी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article