भारतातून लुटलेला अब्जावधींचा खजिना समुद्रात
300 वर्षांपूर्वी डाकूंच्या हल्ल्यात बुडाले होते पोर्तुगाली जहाज
पुरातत्वतज्ञांनी समुद्रात बुडालेल्या 300 वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष शोधले आहेत. या जहाजाच्या अवशेषांमध्ये अमूल्य खजिना असल्याचे सांगण्यात येते, याची किंमत जवळपास 11.74 अब्ज रुपये आहे. नोसा सेन्होरा डो काबोचे हे जहाज 1721 मध्ये मादागास्करनजीक सागरी चाच्यांच्या एका मोठ्या हल्ल्यात बुडाले होते. पोर्तुगाली जहाज भारतातून लिस्बन येथे जात असताना सागरी चाच्यांनी हल्ला केला होता.
या खजिन्याने भरलेल्या जहाजावर 8 एप्रिल ते 17 एप्रिल 1721 या कालावधीत सागरी चाच्यांनी हल्ला केला होता. त्या काळात हा सर्वात कुख्यात हल्ला ठरला होता, कारण यात मोठी लूट झाली होती. भारतातून जात असलेल्या या जहाजावर अब्जावधींच्या खजिन्यासह 200 गुलाम देखील होते, त्यांचे काय झाले हे आजवर कळलेले नाही. नोसा सेन्होरा डो कोबा पोर्तुगाली साम्राज्याचे जहाज होते, ज्यावर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs होती. अशा स्थितीत त्यावर कब्जा होते आणि मग ते बुडणे पोर्तुगाली साम्राज्यासाठी बदनामीचे कारण ठरले होते. पुरातत्वतज्ञांनी 16 वर्षांच्या तपासणीनंतर ऐतिहासिक जहाजाचे अवशेष मादागास्करच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर नोसी बोराहा बेटानजीक अंबोडीफोटात्राच्या उपसागरात शोधल आहेत. जहाजाच्या अवशेषांच्या ठिकाणाहून 3300 हून अधिक कलाकृती मिळविण्यात आल्या आहेत. यात धार्मिक मूर्ती, सोन्याची सामग्री, मोती आणि खजिन्याने भरलेली संदू सामील आहे. एक हस्तिदंताची पट्टीही मिळाली असून त्यावर सोन्याच्या अक्षरांमध्ये ‘आयएनआरआय’ लिहिले आहे. हा लॅटिन शब्द लेसस नाजरेनस रेक्स लुडायोरमचे संक्षिप्त स्वरुप आहे. या खजिन्याचे आजच्या काळातील मूल्य 108 दशलक्ष पाउंडपेक्षा अधिक असू शकते असे ब्राउन विद्यापीठाचे संशोधक ब्रँडन ए. क्लिफोर्ड आणि मार्क आर. एगोस्टिनी यांनी म्हटले आहे.