For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कूपननेच खरेदी करतो अब्जाधीश

06:01 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
कूपननेच खरेदी करतो अब्जाधीश
Advertisement

कूपनद्वारे जिंकलेल्या सायकलने प्रवास

Advertisement

75 वर्षीय जपानी वृद्ध हिरोटो किरितानी यांना ‘गॉड ऑफ फ्रीबीज’ नावाने ओळखले जाते. ते स्वत:च्या अनोख्या लाइफस्टाइलमुळे इंटरनेटवर चर्चेत आले आहेत. कोट्यावधींची संपत्ती असूनही किरितानी दर दिनी कूपन आणि मोफत ऑफर्सचा पूर्ण लाभ उचलतात.

किरितानी हे जपानी बुद्धिबळासारखा खेळ शोगीचे व्यावसायिक खेळाडू होते, त्यांनी स्वत:च्या कारकीर्दीच्या प्रारंभी शेअरबाजारात सिक्युरिटीज फर्ममध्ये टीचर म्हणून काम केले, तेथेच त्यांनी शेअर ट्रेडिंग शिकून घेत स्वत:ची पहिली 10 कोटी येनची कमाई केली, 2024 मध्ये त्यांची संपत्ती वाढून 60 कोटी येनपर्यंत पोहोचली आहे.

Advertisement

2008 च्या मंदीनंतर कंजुषीचा ध्यास

2008 च्या स्टॉक मार्केट क्रॅशमध्ये 20 कोटी येनचे नुकसान झेलल्यावर किरितानी यांनी आता एक पैसाही वाया घालविणार नसल्याचा निश्चय केला. त्यांनी 1000 हून अधिक कंपन्यांचे समभाग खरेदी करत त्यांचे कूपन आणि शेअरहोल्डर परक्सचा वापर सुरू केला. शेअरहोल्डर परक्स हे कंपनी स्वत:च्या समभागधारकांना देत असते. यात डिस्काउंट कूपन, मोफत प्रॉडक्ट सॅम्पल, फ्री तिकिट्स, गिफ्ट्स, बोनस आणि कंपनी इव्हेंट्समध्ये सामील होण्याची संधी समाविष्ट आहे. काही कंपन्या अतिरिक्त लाभ म्हणजेच बोनस शेअर किंवा लाभांश देखील देतात, ज्यामुळे गुंतवणुकदारांची निष्ठा कायम राखण्यास मदत होते.

फ्री कूपनसाठी धावपळ

किरितानी दररोज सकाळी टोकियोच्या रस्त्यांवर स्वत:च्या कूपनद्वारे खरेदी करण्यात आलेल्या सायकलने बाहेर पडतात, तो मोफत खाण्यासाठी रेस्टॉरंटला जातात, फ्री जिममध्ये एक्सरसाइज करतात आणि फ्री मूव्ही तिकिट्सद्वारे दरवर्षी 140 चित्रपट बघतात. ते चित्रपटांच्या कहाणीवर लक्ष देत नाहीत, तर थिएटरच्या आरामदायी सीट्सवर झोपी जातात. कूपनचा योग्य वापर करणे हाच जीवनाचा उद्देश ठरला असल्याचे किरितानी यांचे सांगणे आहे. त्यांच्या अनोख्या कहाणीने त्यांना इंटरनेट सेंसेशन केले आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या या लाइफस्टाइलचे प्रचंड कौतुक करत आहेत.

Advertisement
Tags :

.