कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अब्जावधीचा विमानतळ 3 वर्षांमध्ये बंद

06:06 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ही घटना स्पेन या देशातील आहे. या देशाच्या एका शहरात एक विमानतळ बनविण्यात आला आहे. त्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करण्यात आला आहे. तो बांधला गेला, तेव्हा तो स्पेनच्या संपत्तीत मोठी भर टाकेल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. तथापि, त्याला कोणाची दृष्ट लागली की काय, कोण जाणे, त्याचा प्रारंभ झाल्यापासून अवघ्या तीन वर्षांमध्ये तो अक्षरश: बंद पडला आहे. आज त्याची प्रसिद्धी जगातील सर्वात महाग अयशस्वी प्रकल्प अशी झाली आहे. त्याला स्पेनचा ‘घोस्ट एअरपोर्ट’ असेही नाव स्पेनच्याच नागरीकांनी दिले आहे. या विमानतळावर अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली होती. वर्षाला तो 1 कोटी प्रवाशांचे व्यवस्थापन करु शकेल, असा प्रकारे बनविण्यात आला होता. त्याचा रनवे (विमानांची धावपट्टी) युरोपातील सर्वात लांब, म्हणजे 4.1 किलोमीटरची होती. सर्व सुविधा असतानाही तो काही काळातच ओस पडला.

Advertisement

याचे कारण, तो चुकीच्या स्थानी बांधला गेला होता. स्पेनची राजधानी माद्रिद या शहरापासून तो 200 किलोमीटर दूर होता. पण एवढ्या लांब जाऊन विमान पकडणे माद्रिदच्या नागरीकांसाठी अडचणीचे ठरु लागले. कित्येकदा विमान प्रवासाला कमी वेळ आणि या विमानतळावरुन घरी किंवा कामाच्या स्थानी जाण्याला जास्त वेळ असा प्रकार होऊ लागला. त्यामुळे प्रकल्पाची उपयुक्तता जशी प्रथम अनुमानित करण्यात आली होती, तशी ती राहिली नाही. लोकांनी या विमानतळाकडे पूर्णत: पाठ फिरविली. 2009 मध्ये या विमानतळाचे उद्घाटन एका भव्य समारंभाद्वारे करण्यात आले होते. हा विमानतळ स्पेनचा मानबिंदू ठरेल, अशी भाकिते करण्यात आली होती. तथापि, उद्घाटन झाल्यापासून काही काळातच तो प्रवाशांअभावी बंद करावा लागला. आजही तो त्याच्या स्थानी आहे. तथापि, तेथे एक चिटपाखरुही फिरकत नाही. त्याला सांभाळण्यासाठी मात्र खर्च करावा लागतो.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article