कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नॅट वोल्फसोबत रिलेशनशिपमध्ये बिली इलिश

06:22 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रसिद्ध गायिका बिली इलिश सध्या स्वत:च्या खासगी आयुष्यावरून चर्चेत आहे. अलिकडेच बिलीला इटलीच्या वेनिसमध्ये अभिनेता आणि संगीतकार नेट वोल्फसोबत पाहिले गेले आहे. नेट हा अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार असून त्याला ‘द नेकेड ब्रदर्स बँड’मुळे ओळख मिळाली आहे. यानंतर नेटने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या अभिनयाला दादही मिळाली आहे. नेटने भाऊ एलेक्ससोबत मिळून म्युझिक बँड स्थापन करत अनेक अल्बम प्रदर्शित केले आहेत.  बिली आणि नेटची भेट 2023 मध्ये लॉस एंजिलिसच्या अकॅडमी म्युझियम गालामध्ये झाली होती. दोघांनी टूरेट सिंड्रोमवरून बाँडिंग केले, कारण दोघांनाही हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. बिलीला पाहून ती आमच्यापैकी एक असल्याचे मला वाटल्याचे बिलीने म्हटले आहे. 2024 साली नेटने बिलीच्या ‘हीट मी हार्ड अँड सॉफ्ट’ दूरच्या नॉर्थ अमेरिकन लेगमध्ये स्वत:चा भाऊ एलेक्ससोबत ओपनिंग अॅक्ट म्हणून परफॉर्म केले. याचबरोबर बिलीचे गाणे ‘चिहिरो’च्या म्युझिक व्हिडिओमध्ये तो दिसून आला आहे. बिली आणि नेटला मार्च महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एकत्र पाहिले गेल्यावर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली. तर आता वेसिनमध्sय दोघांना एका पाहिल्यावर त्यांच्या नात्याची पुष्टी झाली.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article