For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj : पायाप्पाचीवाडीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

03:53 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
miraj   पायाप्पाचीवाडीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
Advertisement

           कार-दुचाकी अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Advertisement

मिरज : मिरज तालुक्यातील पायाप्पाचीवाडी येथे नेरज-एरंडोली-सलगरे रस्त्यावर भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे नागेश भंडारे हा दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत भंडारे यांनी मिरज पायाप्पाचीवाडी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. हद्दीत मिरज सलगरे रस्त्यावर गावच्या त्यानुसार कार चालकावर गुन्हा नवसाचा गणपती मंदिराजवळून नागेश भंडारे हा तरुण दुचाकी (CHC 90 3046 8999) ने जात होता. यावेळी टाटा पंच कार (केए १८ एम ७४१७) या चारचाकीने धडक दिली. रस्त्यावरून वळण घेत असताना भरधाव वाहनांचा हा अपघात झाला.

Advertisement

या अपघातात दुचाकीस्वार नागेश भंडारे हा जखमी झाला. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णाला दाखल केले. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे. या रस्त्यावरील वळणावर वेगावर नियंत्रण ठेवावे अशी विनंती स्थानिकांनी वाहनचालकांना केली आहे. नागेश भंडारे यांची प्रकृती स्थिर असन ते उपचार घेत आहेत

Advertisement
Tags :

.