For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेरशीतील अपघातात दुचाकीचालक ठार

11:21 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मेरशीतील अपघातात दुचाकीचालक ठार
Advertisement

पणजी : मेरशी येथे स्प्लेंडर आणि अॅक्टिव्हा या दोन दुचाकीत झालेल्या अपघातात अॅक्टिव्हा चालक ठार झाला. स्प्लेंडर चालकाच्या विरोधात ओल्ड गोवा पोलिसांनी भादंसंच्या कलम 279, 337, 304 (ए) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. हवालदार विनोद केरकर यांनी याबाबत राज्याच्यावतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी रात्री उशिरा झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव राणा ठाकूर उर्फ खिम बहादूर (23 वर्षे) असे असून तो मूळ नेपाळचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मळा पणजी येथे राहत होता. संशयिताचे नाव जयसिंग निवृत्ती देसाई (24 वर्षे) असे आहे. तो मूळ कर्नाटकातील असून सध्या बेती येथे राहत होता.

Advertisement

जयसिंग हा जीए-03- एएन-4949 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून घाईघाईने आणि निष्काळजीपणे मेरशी सर्कलकडून मेरशी मार्केटकडे जात होता. मेरशी येथील आलुवा हॉटेलजवळ आल्यावर उजव्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या अॅक्टिव्हा स्कूटरला धडक दिली. दोघेही खाली कोसळले. अॅक्टिव्हा चालकाच्या डोक्याला जबर जखम झाली, तर स्प्लेंडर चालक किरकोळ जखमी झाला. ओल्ड गोवा पोलिसांनी पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविले. उपचार सुरू असताना अॅक्टिव्हा चालकाचा मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.