रानगव्यांच्या धडकेत दुचाकीस्वार युवती जखमी! नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
कास वार्ताहर
अंधारी - उंबरी मार्गावर सायंकाळी घरी परतात असताना ऋतीका बादापुरे यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यात आलेल्या रानगव्यांनी धडक दिल्याने दुचाकी सह युवती रस्त्यावर कोसळली यात युवती जखमी झाली असुन तिच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऋतीका अशोक बादापुरे वय १९ रा . कासाणी सध्या राहणार जाधव उंबरी ता . जावली हि युवती आपल्या बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरून अंधारी फाट्यावर गेली होती तिला घेऊन घरी परतत असताना अचानक चोरगे उंबरी गावच्या हद्दीतील मंदीरालगत तिन रान गवे रस्त्यावर आले. यातील एका रानगव्यांने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीसह युवती खाली पडल्याने रानगव्यांनी तिच्या अंगावरून पलायन केले या झटापटीत युवतीच्या हातासह पायाला दुखापत झाली. असुन तिला पुढील उपचारासाठी कास पठार वन समितीच्या वाहनातुन सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते आता तिच्यावर सातारमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव बामणोली विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही डी बाटे मुनावळे वनपाल संदीप पवार यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपुस करत योग्य त्या उपचारासंबंधी डॉक्टरांकडुन माहिती घेत नातेवाईकांची भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला असुन वनविभागाने कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी अशी परिसरातुन मागणी होत आहे मात्र दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या वाढत्या हाल्ल्यांनी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे