कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एंजल फौंडेशनतर्फे बाईक रॅली उत्साहात

10:56 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एंजल फौंडेशन व जीवन संघर्ष फौंडेशन यांच्या विद्यमाने रविवारी पारंपरिक बाईक रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व फीत कापून रॅलीला सुरुवात झाली. तेथून महात्मा फुले रोड, बसवेश्वर सर्कल, गोगटे सर्कल, कॅम्प, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड ते कित्तूर चन्नम्मा मार्गावरून रॅलीची कन्नड साहित्य भवनमध्ये सांगता झाली. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर रोपट्याला पाणी घालून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. व्यासपीठावर डॉ. देवेगौडा पाटील, एंजलच्या संस्थापक अध्यक्षा मीनाताई बेनके, जीवन संघर्षचे अध्यक्ष गणपत पाटील, मॉडेल जीमचे कीर्तेश कावळे होते. परीक्षक म्हणून भक्ती शिंदे, प्रणिता शिरोडकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन चंद्रज्योती देसाई यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article