For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

20 वर्षांनंतर धडकले सर्वात मोठे सौर वादळ

06:51 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
20 वर्षांनंतर धडकले सर्वात मोठे सौर वादळ
Advertisement

लडाखपासून फ्लोरिडापर्यंत अनेक शहरांमध्ये आकाश रंगीबेरंगी

Advertisement

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

जगातील सर्वात शक्तिशाली सौर वादळ 20 वर्षांनंतर शुक्रवारी 10 मे रोजी पृथ्वीवर धडकले. वादळामुळे टास्मानियापासून ब्रिटनपर्यंत विविध भागात आकाशात जोरदार वीजा चमकताना निदर्शनास आल्या. यामुळे अनेक उपग्रह आणि पॉवर ग्रीडचेही नुकसान झाले. सौर वादळामुळे जगात अनेक ठिकाणी ध्रुवीय ज्योती (अरोरा) पडण्याच्या घटनाही पाहायला मिळाल्या. यावेळी आकाश वेगवेगळ्या रंगीबेरंगी छटा दिसून आल्या. सौर वादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

Advertisement

‘नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (एनओएए) या अमेरिकन वैज्ञानिक संस्थेच्या म्हणण्यानुसार, या सौर वादळाचा प्रभाव आठवड्याच्या शेवटपर्यंत राहील. हे प्रामुख्याने जगाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागात पाहिले जाऊ शकते. पण जर ते मजबूत असेल तर ते इतर अनेक ठिकाणी दिसून येते. या सौरवादळामुळे जगभरातील सॅटेलाईट ऑपरेटर, एअरलाईन्स आणि पॉवर ग्रिड ऑपरेटर्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अंतराळवीरांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली जात असून सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

आकाशात रंगीबेरंगी प्रकाश

सौर वादळे सूर्यापासून कोरोनल मास इजेक्शनमुळे होतात. कोरोनल मास इजेक्शन दरम्यान सूर्याकडून येणारे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात प्रवेश करतात. या कणांनी पृथ्वीच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर ते चमकदार व रंगीबेरंगी दिसतात. सौर वादळांचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो. अशा वादळांमुळे पॉवर ग्रीडचेही नुकसान होते. याशिवाय विमानसेवेतील सिग्नलिंगमध्येही समस्या येऊ शकते.

यापूर्वी 2003 मध्ये सौर वादळ

सध्या धडकलेले सौर वादळ ऑक्टोबर 2003 च्या ‘हॅलोवीन स्टॉर्म’नंतरचे दुसरे मोठे वादळ आहे. हॅलोविन वादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआऊट झाले होते. तसेच दक्षिण आफ्रिकेत ग्रीड्स विस्कळीत झाले होते. आता या नव्या वादळामुळे येत्या काही दिवसांत पृथ्वीवर आणखी सीएमई कण येऊ शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात आणखी अनेक सौर वादळे येऊ शकतात, असा  ‘एनओएए’चा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.