कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

06:41 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजौरी, कुलगाममध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा :  शोधमोहीम सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच राजौरीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याने दोन ठिकाणच्या कारवाईत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात सुरक्षा दलांची कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी पाच दहशतवादी मारले गेले आहेत. कुलगाम जिह्यातील सामनू गावात काही दहशतवादी घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकवटल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर राज्य पोलीस, लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवादी उपस्थित असलेल्या गावाला वेढा घालत गुऊवारी दुपारी शोधमोहीम सुरू केली. दुपारी चारच्या सुमारास लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मधून-मधून गोळीबार सुरू होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत मध्यरात्रीच्या सुमारास तिघांचा खात्मा करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यानंतर आणखी दोघांना यमसदनी पाठविण्यात आले.

गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी परिसरात घरोघरी शोधमोहीम राबवली. घेरलेल्या दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी गावातील सर्व प्रवेशमार्ग आणि बाहेर पडण्याचे रस्ते सील करण्यात आले होते. सुरक्षा दलांना कुलगाममध्ये काही दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचराकडून माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान, एका दहशतवाद्याने घरातून गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक झाली. एकंदर या संघर्षात लष्कर-ए-तोयबाचे पाच दहशतवादी ठार झाल्याचे काश्मीरचे आयजीपी व्ही. के. बिर्डी यांनी सांगितले.

राजौरीमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने बुधल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेहरोटे परिसरात एक कारवाई सुरू केली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. परिसरातील संशयास्पद हालचालींच्या माहितीच्या आधारे कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 रायफल, तीन मॅगझिन, तीन ग्रेनेड आणि एक पाउच जप्त करण्यात आला. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात आहे.

एलओसीवर सैनिक सतर्क

उरी सेक्टरमध्ये वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. देशभरात दहशतवादी पाठवून पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा नापाक प्रयत्न करत आहे. परंतु आमचे सुरक्षा दल नियंत्रण रेषेवर मजबूत सुरक्षा ग्रीडसह सतत कडक नजर ठेवत आहेत. घुसखोरीचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडून भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे कर्नल राघव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article