महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूर्णेश मोदींवर मोठी जबाबदारी

06:20 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 दोन केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पूर्णेश यांना दादरा नगर हवेली आणि दमण दीवचे प्रभारी बनवण्यात आले आहे. सध्या ते गुजरातच्या सुरत पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकातील कोलारमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केले होते. याबाबत पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात राहुल यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द झाली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा खासदारपद बहाल करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article