कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पीएच. डी. ची यंदा बिग भरती

01:06 PM Sep 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे :

Advertisement

शिवाजी विद्यापीठांतर्गत 42 विषयांच्या पीएच. डी. च्या 619 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यांना 245 मार्गदर्शक आहेत. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 2 हजार 956 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. पीएच. डी.च्या प्रवेशापासून ते पदवी जाहीर होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. त्यामुळे यंदाच्या पीएच. डी. च्या बिग भरतीकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पीएच. डी. च्या रिक्त जागांसाठी दरवर्षी परीक्षा होत असते. परंतू यंदा सगळ्यात जास्त जागा रिक्त आहेत. प्रवेशपूर्व परीक्षा नऊ व दहा सप्टेंबरला घेतली जाणार आहे.

दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना इंटरनेट, प्रवेशापासून, पीएच. डी. जाहीर होईपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच ज्या दिवशी व्हायवा होईल त्याच दिवशी पीएच. डी. पदवी जाहीर झाल्याचे सर्टिफिकेट दिले जाते. मार्गदर्शक शिक्षकांनाही ऑनलाईन सुविधा दिल्या. यामुळे थिसेस तपासण्यापासून ते ऑनलाईन व्हायवादेखील घेतला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीन ते पाच वर्षाचे संशोधन दोन ते तीन वर्षातच पूर्ण केले. यामुळे यंदा पीएच. डी. च्या सगळ्यात जास्त जागा रिक्त झाल्या आहेत.

पीएच. डी. संशोधन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे 619 जागांसाठी तब्बल 2 हजार 956 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सगळ्यात 102 जागा रिक्त आहेत. त्यापाठोपाठ केमेस्ट्रीच्या 91 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या विषयाच्या विद्यार्थ्यांना संशोधनाची जास्तीत जास्त संधी मिळाली. या जागांसाठी स्पर्धा असल्यानेच क्षमतेपेक्षा चौपट विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. पीएच. डी. ऑनलाईन प्रक्रियेचे संपूर्ण काम पीजीबीयुटीआर विभागाचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयम पाहतात.

पीएच. डी. थिसेस पूर्वी सहा प्रतीमध्ये सादर करावा लागत होता. आता ग्रंथालयासाठी एकच थिसेस घेतला जातो. अन्य प्रती विद्यार्थ्यांच्या लॉगइनमधून सादर करावयाची आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन प्रवेशापासून ते पीएच. डी. जाहीर होईपर्यंतच्या सर्व सुविधा ऑनलाईन आहेत. यामुळे पीएच. डी. च्या कामात पारदर्शकता आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचतो आहे.

विद्यार्थी हित लक्षात घेऊन प्रवेशापासून ते पीएच. डी. पदवी जाहीर होईपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. यंदा सगळ्यात जास्त जागा रिक्त झाल्या आहेत. प्रवेश परीक्षेनंतर रिसर्च रिकग्नेशन कमिटी, रिसर्च अॅडव्हायझरी कमिटीसही लॉगईनमधून काम करता येते.
- डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ

अकौंटन्सी 3, आर्किटेक्चर 8, बायोकेमेस्ट्री 3, बायो-टेक्नॉलॉजी 5, बॉटनी 12, बिझनेस इकॉनॉमी 6, बिझनेस मॅनेजमेंट 12, केमिकल इंजिनिअरिंग 12, केमेस्ट्री 91, सिव्हील इंजिनिअरिंग 3, कॉमर्स 24, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन फॅकल्टी ऑफ कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट 6, कॉम्प्युटर सायन्स 4, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग 26, इकॉनॉमिक 6, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग 24, इकॉनॉमिक्स फॉर एमएस्सी स्टुडन्स 4, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इंजि. एम. टेक. 10, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 42, इंग्लिश 36, इन्व्हारमेंटल सायन्स 2, इन्व्हारमेंटल सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग 10, फुड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी 2, जिओग्राफी 4, जिओलॉजी 2, हिंदी 8, हिस्ट्री 3, लॉ 1, लायब्ररी अॅण्ड इन्फर्मेशन सायन्स 2, मराठी 26, मॅथॅमॅटिक्स 3, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 102, मायक्रॉलॉजी 22, नॅनो सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी 6, फार्मसी 15, फिजिक्स 20, पॉलिटिकल सायन्स 4, सायकॉलॉजी 4, सोशालॉजी 2, स्ट्रॅटिक्स 6, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग 34, झुलॉजी 4 अशी एकूण 619 आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article