महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रीक वाहन निर्यातीत भारताला नामी संधी : आदित्य जयराज

06:27 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

स्टेलांटीस भारताला इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्यातीचे मोठे हब करण्यासाठी योजना बनवत आहे. जागतिक स्तरावर कार्यरत असणारी ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील कंपनी स्टेलांटीस इंडिया यांनी भारतावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भारत हा इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्यातीकरता महत्त्वाचा देश होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

स्टेलांटीस इंडिया यांनी आपल्या मेड इन इंडिया अंतर्गत ‘इ सी 3’ या इलेक्ट्रिक कारचा पुरवठा इंडोनेशियाला केला आहे. जवळपास 500 कारची निर्यात कंपनी इंडोनेशियाला करणार आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करून त्यांची निर्यात इतर देशांना करण्यासाठी यापुढेही कंपनीचे प्रयत्न असणार असल्याची माहिती स्टेलांटीस इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आदित्य जयराज यांनी म्हटले आहे.

 भारताबाबत काय म्हणाले सीईओ

भारत सरकारच्या मेक इन इंडिया या मोहीमेअंतर्गत कंपनीने इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली असून या मार्फत इतर देशांना निर्यातीचे लक्षही साध्य केले जाणार आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीची संधी मिळाली असून ती उत्तमपणे साध्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article