महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्सकडून भारताला मोठी ऑफर

06:05 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आण्विक पाणबुडी, अंडरवॉटर ड्रोन पुरविणार

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारत आणि फ्रान्स रणनीतिक संरक्षण भागीदारीच्या दिशेने मोठे पाऊल उचलणार आहेत. फ्रान्सने भारताला आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीत मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचबरोबर 110 किलो-न्यूटन थ्रस्ट विमान इंजिन आणि अंडरवॉटर ड्रोन तंत्रज्ञानाच्या 100 टक्के हस्तांतरणाची ऑफर फ्रान्सने भारताला दिली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राजनयिक सल्लागार यांच्यात भारत-फ्रान्स रणनीतिक चर्चेत या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही सल्लागारांदरम्यान 30 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरदरम्यान बैठक होणार आहे.  फ्रेंच अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये ही पहिली द्विपक्षीय रणनीतिक भागीदारी असेल.

भारत आणि फ्रान्स यापूर्वीच अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहेत. यात अंतराळ तंत्रज्ञान देखील सामील आहे. भारतीय नौदल भविष्यातील गरजा विचारात घेत आण्विक हल्ला करण्यास सक्षम असलेल्या पाणबुड्यांच्या निर्मितीवर कामत आहे. अशा स्थितीत फ्रान्सने ही ऑफर दिली आहे. फ्रान्सने भारताला आकाश, जमीन आणि अंडरवॉटर पूर्ण स्पेक्ट्रम स्वायत्त प्रणालीही सादर केली आहे. भारताच्या आयएसआर (गुप्तचर, देखरेख आणि टेहळणी) क्षमता वाढविणे आण पाणबुडीसारख्या नौदलाच्या संपत्तींच्या सुरक्षेत ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकते.

लढाऊ विमानासंबंधीही चर्चा

डोवाल हे पॅरिसमध्ये सफ्राइन इंजिनचे अध्यक्ष रॉस मॅकइन्स यांची भेट घेत भारत सरकारला देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. सफ्रानने भारताला भविष्याच्या अत्याधुनिक मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) प्रकल्पासाठी 110 केएन इंजिन्सची संयुक्त निर्मिती करण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. हे इंजिन भारताची सार्वभौम संपत्ती असेल, यामुळे ते कुठल्याही निर्बंधांशिवाय भारत अन्य देशांना निर्यात करू शकणार आहे. सफ्रानने एएमसीएच्या नव्या वर्जनसाठी या जेट इंजिनला अपग्रेड करण्यासाठी भारतासमोर मदतीचा प्रस्ताव मांडला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article