For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग -रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार !

03:03 PM Apr 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग  रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडे नेते उतरणार प्रचारात !

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे . महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चुरस असून दोन्हीही पक्षांकडून आता प्रचारात पक्षाचे वरिष्ठ नेते उतरणार आहेत. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, सुषमा अंधारी हे पहिल्या फेरीत प्रचारासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली . त्यानंतर अंतिम प्रचार काळात पक्षाचे प्रमुख नेते या मतदारसंघात येणार आहेत. त्याचे नियोजनही सुरू आहे. एकंदरीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून सिंधुदुर्ग -रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. बडे नेते प्रचारात येणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारात आदित्य ठाकरे लवकरच येणार आहेत. त्यांची जाहीर सभा सावंतवाडीत होणार आहे . तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारी यांची कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडी नियोजन करत आहे. तर, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सभा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे काँग्रेसचे नेतेही प्रचारात येण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे . तर महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही प्रचारात शेवटच्या टप्प्यात येणार आहेत असे एकंदरीत प्रचारात दोन्हीही पक्षांकडून नियोजन सुरू आहे. आता 20 एप्रिल पासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरोघरी प्रचार दोन्ही पक्षाकडून झाला आहे. आता गावागावात कॉर्नर सभा व जाहीर सभा होणार आहेत . त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. व जाहीर प्रचारांसाठी जागाही निश्चित करण्यात येत आहेत असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.