कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सप्ताहाच्या अंतिम सत्रात मोठी घसरण

06:55 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 589 अंकांनी प्रभावीत : गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले.  काश्मीर हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. यामध्ये निफ्टी-50 आणि बीएसई सेन्सेक्स अनुक्रमे 0.86 आणि 0.74 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 588.90 अंकांनी घसरुन निर्देशांक 79,212.53 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 207.35 अंकांनी घसरुन 0.86 टक्क्यांसह 24,039.35 वर बंद झाला.

 घसरण होण्याचे कारण काय?

  1. अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज फायनान्स, इटरनल, टाटा मोटर्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि एल अँड टी यासारख्या निर्देशांकात घसरण
  2. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून आला.
  3. अल्फानिटी फिनटेकचे सह-संस्थापक आणि संचालक यूआर भट यांच्या मते, पहलगाममधील घटनेनंतर बाजारात थोडी भीती आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेच्या टॅरिफच्या भीतीवर अलिकडेच कपात झाल्यानंतर बाजारात तेजी आली होती. परंतु भारत-पाकिस्तान राजकीय परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत सावधगिरी बाळगत आहे.

गुंतवणूकदारांनी 11 लाख कोटी बुडाले

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचे नुकसान झाले. शुक्रवारी बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 419,65,902 कोटी रुपयांवर घसरले. गुरुवारी बाजार बंदनंतर ते 43,042,123 कोटी रुपये होते. परिणामी, कंपन्यांचे बाजारी भांडवल 10,50,393 कोटी रुपयांनी कमी झाले.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

अॅक्विनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक आणि प्रमुख जी चोकलिंगम म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या घडामोडींमुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होत राहील आणि त्यामुळे आणखी घसरण होऊ शकते.

जागतिक बाजारपेठेतून काय संकेत ?

जागतिक आघाडीवर, आशियाई शेअरबाजार देखील तेजीत होते. वॉल स्ट्रीटवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजार देखील वधारले होते. व्याजदरात तुलनेने लवकर कपात करण्याच्या वाढत्या अपेक्षांमुळे अमेरिकन बाजार तेजीत होते. दरम्यान, दक्षिण कोरियाचे समभाग तेजीत होते. पुढील आठवड्यापर्यंत अमेरिका व्यापार करार करू शकते असे वृत्त आहे.

Advertisement
Next Article