Solapur | सोलापूरमध्ये मोठी विकास योजना ; होटगी येथे 50 एकर जागेवर होणार आयटी पार्क !
सोलापुरात दीड वर्षात आयटी पार्क उभे राहणार
सोलापूर : होटगी येथील नियोजित आयटी पार्कच्या संदर्भातचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. सुमारे ४० कोटी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मागील तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठविण्याचा आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते.
त्यानुसार हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या इमारतीत सुमारे ४५ हजार कर्मचारी काम करतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असून सुमारे दीड वर्षात आयटी पार्कची उभारणी शक्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी येथील जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची ५० एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
जागेसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला एमआयडीसी विभागाकडून दिले जाणार आहे. अतंर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी मुलभूत सुविधांसाठी सुमारे ३७ ते ३८ कोटी रुपये लागणार आहे. होटगी रोडवरील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची सध्या २० केपीएलडी क्षमतेची डिस्टीलरी प्रकल्प आहे. त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात १०० केपीएलडी क्षमतेची होणार आहे. यात झीरो लिक्वीड डिस्चार्ज (झेएलडी) तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास हा शुन्यावर येणार आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी याबाबतची माहिती भेटून सादर केली असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
इमारत बांधकामाला विमानसेवेचा होणार नाही अडथळा
होटगी रोडवरील विमानतळावरुन उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही. याठिकाणी ५० मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते. याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. पुण्याच्या हिंजवडीपेक्षा रवरतात होटगी येथे जागा आयटी पार्क कंपनीसाठी उपलब्ध होणार आहेत.