For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरण (मामा) ठाकुर यांचे गोव्यासाठी मोठे योगदान!

11:56 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरण  मामा  ठाकुर यांचे गोव्यासाठी मोठे योगदान
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार: वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Advertisement

पणजी : दैनिक तरुण भारतचे समूहप्रमुख तथा सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी लि.’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांना 72 व्या वाढदिवसानिमित्त तसेच पुणे येथे आयोजित सत्कारसोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनता आणि राज्य सरकारच्यावतीने शुभेच्छा व्यक्त करून सुयश चिंतीले आहे. त्याप्रित्यर्थ जारी केलेल्या व्हिडिओ संदेशातून मुख्यमंत्र्यांनी डॉ. किरण ठाकुर यांच्या चौफेर कार्याचा गौरव केला आहे. डॉ. किरण ठाकुर यांना गोव्यात मामा ठाकुर म्हणूनच ओळखतात. गोव्यातील सर्वाधिक खपाचे दैनिक असलेले ‘तरुण भारत’ वृत्तपत्र आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी या दोन प्रसिद्ध संस्थांच्या माध्यमातून ते सदोदित जनसंपर्कात असतात. राज्यात गत अनेक वर्षांपासून त्यांचे सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य सुरू आहे. त्यासाठी आपण त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मामांच्या कार्याची व्याप्ती गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्येही विस्तारलेली असून सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपण स्वत: गत सुमारे 25 वर्षांपासून त्यांना ओळखत आहे. गोव्यात चाललेले त्यांचे विविधांगी कार्य आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सदोदित घेतलेला सहभाग, तसेच तरुण भारतच्या माध्यमातून त्यांनी हाताळलेले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषय आपण जवळून पाहिलेले आहेत. लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही त्यांनी फार मौलिक कार्य चालविले असून असंख्य गोमंतकीयांना रोजगाराच्या संधी देतानाच अनेकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्याचा हात दिलेला आहे. यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्यावर आधारित केलेले पुस्तक तथा पोस्टर प्रदर्शन भारतातील असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची ओळख करून देणारे होते. त्याशिवाय त्यांनी आयोजित केलेला राज्यस्तरीय दिंडी महोत्सव तर अभूतपूर्व असाच होता. तसेच मिलिटरी बँड पथकांचे राज्यातील विविध शहरांमध्ये सादरीकरण हा त्यांचा उपक्रमही आगळावेगळा आणि सर्वांना प्रोत्साहन देणारा होता, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.