गुगल सर्चमध्ये होणार मोठे बदल
सीईओ सुंदर पिचाई अनेक बदल करण्याची शक्यता
नवी दिल्ली :
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई गुगल सर्चमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहेत. देश आणि जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर पाहता, येणाऱ्या काळात गुगल सर्चमध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. हे सर्च इंजिन पूर्णपणे बदलून अन्य नवीन बाबी त्यामध्ये जोडल्या जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. असे मानले जाते की, या वर्षाच्या अखेरीस गुगल सर्चचा चेहरा पूर्णपणे बदलू शकतो. जेणेकरून वापरकर्त्यांना चांगली सेवा मिळू शकेल. गुगल एआयद्वारे शोध सुलभ करण्यासाठी काम करत आहे. एआय प्रकल्पावर काम करणारी गुगलची डीपमाइंड रिसर्च टीम यासाठी काम करत आहे. बदलानंतर अधिक नवीन वैशिष्ट्यो दिसू शकणार असल्याचा दावाही केला जात आहे.
गुगलचे अनेक प्रकल्पांवर काम
गुगलकडे अनेक एआय प्रकल्प रांगेत आहेत. ज्यामध्ये अॅस्ट्रा आणि जेमिनी हे मुख्य डीप रिसर्च मानले जातात. प्रोजेक्ट अॅस्ट्राद्वारे लाईव्ह व्हिडिओ प्रोसेसिंग केले जाईल. यासोबतच, या काळात प्रश्न आणि उत्तरे देखील करता येतील. जेमिनी डीप रिसर्चबद्दल सांगायचे झाल्यास ते अधिक जटिल प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विकसित केले जात आहे. याशिवाय, प्रोजेक्ट मरिनरवर देखील काम सुरू आहे. ज्याद्वारे क्रीनवरील माहिती वाचणे सोपे होईल.
वापरकर्त्यांवर परिणाम होईल का?
गुगलमधील बदलांचा परिणाम केवळ वापरकर्त्यांवरच नाही तर व्यवसायांवरही होईल. यानंतर गुगल सर्चची क्षमता वाढेल. एआय तंत्रज्ञानाद्वारे जाहिराती आणि ट्रॅफिक व्यवस्थापित करता येईल. यामुळे इंटरनेटशी कनेक्ट होण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे.