For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इथेनॉल प्रकल्पाच्या चुकीच्या कारवाईचा बिद्रीच्या कामगारांकडून निषेध

04:17 PM Jun 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
इथेनॉल प्रकल्पाच्या चुकीच्या कारवाईचा बिद्रीच्या कामगारांकडून निषेध
Bidri workers protest
Advertisement

काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा

Advertisement

सरवडे प्रतिनिधी 
बिद्री साखर कारखान्याच्या  इथेनॉल प्रकल्पावर राज्य सरकारने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज कारखाना कार्यस्थळावर सर्व कामगारांनी निषेध सभा घेतली. यावेळी तीव्र शब्दात निषेध करून नाराजी व्यक्त केली तर कामगारांनी वेळ आलीच तर उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे सांगितले. दरम्यान कामगारांनी आज दिवसभर निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले.
यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर म्हणाले, बिद्री साखर कारखाना हा कुणा एकाच्या मालकीचा नाही तर त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. मात्र केवळ राजकीय सुडबुध्दीने कोणी चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करीत असेल बिद्रीचे कामगार गप्प बसणार नाहीत.
मौनीनगर कामगार पत संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण फराकटे म्हणाले, बिद्रीचा कारभार कसा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र केवळ के पी पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने कारवाई करणे हे चुकीचे आहे. यापुढे कामगारांच्या वतीने तीव्र उभा केला जाईल.
अजित आबिटकर म्हणाले, या कारखान्यावर हजारो कामगारांची व लाखो शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहेत.
कारखान्याच्या चांगल्या कारभारामुळे नावलौकिक झाला आहे. अशा कारखान्यावर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी आहे. अशोक फराकटे म्हणाले,कारखान्याच्या कारभाराला आमदार प्रकाश आबिटकर केवळ राजकीय द्वेशापोटी सातत्याने विरोध करीत आहेत. वेळ प्रसंगी आमरण उपोषण करावे लागेल. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.