महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाषणावेळी बिडेन यांचा उडाला गोंधळ

06:20 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झेलेंस्कींना संबोधिले पुतीन : कमला हॅरिस यांचा ट्रम्प असा उल्लेख

Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत आता अध्यक्ष जो बिडेन यांचे वय आणि त्यांच्या अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीवरून वाद वाढत चालला आहे. याचदरम्यान 81 वर्षीय अध्यक्षांनी नाटो परिषदेत अनेक लोकांची नावे चुकीची घेत स्वत:च्या अध्यक्षीय उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाटो परिषदेदरम्यान बिडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांना त्यांनी राष्ट्रपती पुतीन असे संबोधिले. तर काही वेळानंतर त्यांनी स्वत:च्या या चुकीची पुनरावत्ती केली. तर त्यानंतर ते अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव विसरले आणि त्यांना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प असे संबोधिले आहे.

नाटोला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकेत 9-11 जुलैदरम्यान एक परिषद आयोजित झाली. यात नाटोचे सदस्य देश सामील झाले. परिषदेच्या अखेरीस बिडेन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. बिडेन हे स्वत:चे बोलणे संपवून झेलेंस्की यांना बोलावित होते. यादरम्यान त्यांनी आता मी युक्रेनच्या अध्यक्षांना बोलावू इच्छितो, अध्यक्ष पुतीन हे जितके साहसी आहेत तितकेच समर्पित असे उद्गार काढल्याने उपस्थित सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसून आले.

पुन्हा केली चूक

यानंतर बिडेन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना पुन्हा चूक केली. डेमोक्रेटिक पार्टीने कमला हॅरिस यांना अध्यक्षीय उमेदवारी दिल्यास त्या ट्रम्प यांना पराभूत करू शकतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. जर उपाध्यक्ष ट्रम्प  अध्यक्ष होण्यास पात्र नसत्या तर मी त्यांना कधीच उपाध्यक्ष केले नसते असे वक्तव्य बिडेन यांनी केले. अमेरिकन अध्यक्षांना स्वत:च्या उपाध्यक्षांच्या नावाचा पडलेला विसर पाहून सर्वांनाच धक्का बसला.

बिडेन यांचे स्पष्टीकरण

कमला हॅरिस आणि झेलेंस्की यांच्या नावाचा विसर पडल्याने टीका सुरू झाल्यावर बिडेन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी नाव विसरल्याने नाटोच्या परिषदेला कुठले नुकसान झाले का? याहून अधिक यशस्वी नाटो परिषद यापूर्वी झाली नव्हती. पुतीन यांच्याविषयी बोलत असल्याने चुकून त्यांचे नाव तोंडी आले आणि याकरता मी झेलेंस्की यांची माफीही मागितली असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे. तर बिडेन यांचा उडालेला गोंधळ पाहता ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ओबामा, पेलोसीही चिंतेत

डेमोक्रेटिक पार्टीत अध्यक्षपदासाठी बिडेन यांच्या उमेदवारीवर चिंता वाढत आहे. आता माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि नॅन्सी पेलोसी यांनीही बिडेन यांच्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तर पेलोसी आणि ओबामा यांनीच डेमोक्रेटिक पार्टीत बिडेन यांची सातत्याने पाठराखण केली होती. नाटो देशांचे नेते स्वत:च्या मायदेशी परतल्यावर या मुद्द्यावर चर्चा करू असे पेलोसी यांनी आता म्हटले आहे. डेमोक्रेटिक पार्टीतील अंतर्गत कलह आता वाढत चालला आहे. यांमुळे पक्षाला ट्रम्प यांना पराभूत करणे अवघड ठरू शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article