भूमिपूजन केलं आणि चाव्याही दिल्या हीच मोदी गॅरंटी : पंतप्रधान मोदी
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर-अहमदाबाद या दोन्ही शहरांचे ऋणानुबंध आहेत. कारण दोन्ही शहरे वस्त्रोद्योग शहरासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, जुन्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. दरम्यान, जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देणार असे सांगतानाच तुम्ही मोठी स्वप्ने बघा ती पूर्ण करण्याचा संकल्प आणि गॅरंटी माझी असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील रे नगर येथील 15 हजार गृहप्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विचार मंचावर राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम आदी उपस्थित होते.
'या' लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द
पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यात वाईडिंग कामगार शैलाबाई तोळणूर, विडी कामगार रजिता मडूर, विडी कामगार रिझवाना मकानदार, घरकाम करणाऱ्या सुनीता जगले, शिलाई कामगार बाळाबाई वाघमोडे या पाच महिलांचा समावेश आहे.
- पीएम आवास योजनेतर्गंत आज देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण
- १ लाखांहून अधिक कुटुंबाचा गृह प्रवेश
- गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव
- पहिल्या टप्प्यात 15 हजार घरांचे लोकार्पण
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर येथे असंघटित कामगारांचे 30 हजार घरांचा प्रकल्प