Satara News : भुईंज पोलिसांना मिळणार आता हक्काचे निवासस्थान!
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारींनी भुईंज पोलीस स्टेशनला भेट दिली
भुईज : भुईंज पोलीस स्टेशनच्या आधिकारी व कर्मचारी यांना लवकरच हक्काचे निवासस्थान मिळणार आहे. बरेच वर्षे रखडलेल्या या वास्तूसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनिल फुलारी यां दखल घेत पाठपुरावा करून देण्याचे आदेश दिले.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी अचानक भुईंज पोलीस स्टेशनला भेट दिली.
यावेळी दोन तास वेळ देत त्यांनी महामार्गालगतचा परिसर व पोलीस स्टेशनचे विविध कक्ष अधिकारी कश्न, डी. बी. रूमसह संपूर्ण परिसर बारकाईने पाहत विविध सूचना केल्या व त्यानंतर भुईंज येथीलपत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी माहिती देताना त्यांनी सांगितले की, भुईंज पोलीस स्टेशन हे महामार्गावरील महत्वपूर्ण असून येथील अधिकारी-कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या कौतुकास्पद कामामुळे स्मार्ट पोलीस ठाणे, आयएसओ व नुकतेच पुणे विभागात सर्वोकृष्ट ठरलेले हे पोलीस स्टेशन अधिक सुसज्य व हायटेक करण्यासाठी पोलीस दल प्रयत्न करणार आहे.
येथील कर्मचारीआधिकारी यांचे निवासस्थानाचा विषय बरीच वर्षे प्रलंबित असून नवीन इमारत निर्मातीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे सांगत त्यांनी महामार्गावर शनिवारी, रविवारी पाचगणी महाबळेश्वरची खोळंबणारी वाहतुकीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याबर जबाबदारी देत विशेष कुमक नेमण्याच्या सूचना केल्या.
प्रारंभी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे स्वागत सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी केले. बाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांनी परिसराची माहिती दिली. तर भुईज प्रेस क्लबच्या वतीने राहुल तांबोळी, जयवंत पिसाळ, विलास साळुंखे, पांडुरंग खरे, किशोर रोकडे यांनी संवाद साधला.