For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यमबाग पोस्ट ऑफिस कार्यालयाचे भूमिपूजन

11:10 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्यमबाग पोस्ट ऑफिस कार्यालयाचे भूमिपूजन
Advertisement

25 लाख रुपयातून उभारणार हायटेक कार्यालय

Advertisement

बेळगाव : उद्यमबागमध्ये हायटेक पोस्ट ऑफिस बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. गुरुवारी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. एकूण 25 लाख रुपये खर्चून सुसज्ज पोस्ट ऑफिस उद्यमबाग येथे सुरू केले जाणार आहे. याचा फायदा उद्यमबाग, अनगोळ परिसरातील औद्योगिक वसाहती व नागरिकांना होणार आहे. उद्यमबाग येथे भाडोत्री जागेमध्ये पोस्ट ऑफिस होते. यामुळे अनेक अडचणी येत होत्या. पोस्ट कार्यालयाकडे जागा होती परंतु निधीची कमतरता होती. खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पोस्ट ऑफिस उभारणीसाठी निधी मंजूर करून आणला. उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी पोस्ट ऑफिस उभारले जाणार आहे. येथे कारखान्यांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने कागदपत्रांची देवाणघेवाण अधिक असते. स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सलचे प्रमाण अधिक असल्यामुळे पोस्ट ऑफिसला मोठ्या जागेची गरज होती. केंद्रीय मंत्र्यांनी निधी मंजूर केल्यामुळे 25 लाख खर्चून इमारता बांधकाम केले जाणार आहे. यावेळी पोस्ट विभागाचे अधीक्षक विजय वडोनी, साहाय्यक अधीक्षक इराण्णा मुत्नाळी व पोस्ट खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.